जास्त पैसे मोजणऱ्याच्याच बाजूने सई !

f431bd4b1421a21fd1c79759b01a6855_ft_mआगामी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जो पक्ष जास्त पैसे देईल त्याच पक्षाचा प्रचार करणार असे रोखठोक मत अभिनेत्री सई ताम्हाणकर हिने ठाण्यात आज बोलतानी केले आहे. एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या सईच्या या वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे.

सई म्हणते, निवडणुकींच्या काळात विविध पक्ष प्रलोभने दाखवून प्रचार करतात ही पद्धत अतिशय वाईट आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या सईने मात्र निवडणूक लढवण्याला चक्क मात्र हातच जोडले असल्याचे म्हटले आहे.

लागू बंधू ज्वेलर्स यांच्या दुकानातील एका कार्यक्रमा निमित्त सई ठाण्यात आली असतांना तिने दागिन्यांच्या बाबतीत आपण खुप चोखंदळ असल्याचे सांगितले. तसेच स्त्री असल्याने दागिने घालायलाही आवडत असल्याचे मत व्यक्त केले .

Source: Jaimaharashtra News