‘Time Bara Vait’ remake of Tamil-Malayalam film release on 19 June

‘टाइम बरा-वाईट’

‘टाइम बरा-वाईट’

‘वेळ कोणासाठी थांबत नाही’ तसेच ‘गेलेली वेळ परत कधीच येत नाही’ म्हणूनचप्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. वेळ चुकली की पुढच्या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतात हा आत्तापर्यंतचा बहुदा सगळ्यांनीच घेतलेला अनुभव… हाच विषय थोड्या हटक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी केला आहे.वी. आर. जी. मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत’टाईम बरा वाईट’ हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येत्या १९ जूनला प्रदर्शित होत आहे.

भन्नाट व्यक्तिरेखा, रोमांचकारी स्टंटस, प्रेमकहाणी आणि विनोदाचा मनोरंजक तडका असा सगळा मसाला असणारा ‘टाईम बरा वाईट’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटातील नायक राहुल आणि नायिका प्रिया यांच्याभोवती गुंफण्यात आलेली ही कथा एका वेळेवर येऊन थांबते. संध्याकाळी पाच वाजता नक्की काय होणार आहे…? नेमकं कोणतं रहस्य या वेळेत दडलंय…? आणि मुख्य म्हणजे ही वेळ कोणासाठी चांगली व कोणासाठी वाईट असणार…? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. संकलक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या राहुल भातणकर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असून त्यांनी या चित्रपटाचे वेगवान संकलनही केले आहे.

विजय गुट्टे निर्मित आणि बाहुल चौधरी, अनुराग श्रीवास्तव सहनिर्मित ‘टाईम बरा वाईट’द्वारा नेहमीच्या परिघाबाहेरील वेगळा कथाविषय हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, संजय मोने, आनंद इंगळे, सतीश राजवाडे, ऋषिकेश जोशी, भाऊ कदम, सिद्धार्थ बोडके, विश्वजीत प्रधान, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसलेआदी कलाकारांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री निधी ओझा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘टाईम बरा वाईट’ची वेगवान कथा-पटकथा लिहिली आहे.अल्फान्सो पुत्रण आणि राहुल भातणकर यांनी तर संवाद राजेश कोळंबकर, राहुल भातणकर या द्वयींनी लिहिलेत.

‘टाईम बरा वाईट’मध्ये एकूण चार गाणी असून साऊथच्या तडक-भडक बिट्सचा आनंद मराठी रसिकांना याद्वारे घेता येईल.चित्रपटात ‘कादल स्नेहम मोहोब्बत’, ‘दौडा दौडा’, ‘तूतिया’ आणि ‘वाऱ्याचे गुणगुणतो गाणे’ यांसारखीविविध धाटणींची गाणी असून मंदार चोळकर आणि अभिषेक खानकर लिखित या गीतांना हृषीकेश रानडे, अजित परब आणि आदर्श शिंदे यांचा स्वर लाभला आहे. फाईटमास्टर प्रद्युम्न कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कथानकाला साजेशी साह्स्दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.

वेळचे महत्त्व मनोरंजक पद्धतीने अधोरेखित करणारा ‘टाईम बरा वाईट’ १९ जूनपासून चित्रपटगृहात दाखल होतोय.

‘Time Bara Vait’ is directed by Rahul Bhatankar under VRG Motion Pictures banner starring Bhushan Pradhan, Satish Rajwade, Nidhi Oza, Vishwajeet Pradhan. The movie will release on 19 June 2015. The film is a remake of Tamil-Malayalam Bilingual film Neram directed by Alphonse Putharen, starring Nivin Pauly, Nazriya Nazim and Bobby Simha.

The story revolves around the life of Rahul, a computer engineer who lost his job. As he is jobless, he is also turned down by his girlfriend – Priya’s father, who he was about to marry.

At the same time he is hounded by a shark loan – Bhai Raja from whom he borrowed money for his sister’s marriage. At the present day he has a dead line to return money to the shark loan till 5 pm. His day turns upside down when he is robbed of money he got from his best friend to repay Bhai Raja.[4] Meanwhile Priya decides to run away from her father and elope with Rahul. Suspecting on Rahul, Priya’s father lodges a complaint against him in the nearby police station. So now Rahul is a fugitive from both, the law as well as Bhai Raja. Rahul is broke, confused and helpless and adding to his problems he is also pressurized by his brother in law to give a hefty amount to start a business. Helpless and desperate Rahul wants to get out of the nightmare.

Will he be able to repay his loan and get the love of his life in the same day? Rahul has yet to experience a lot as the day is yet to be finished.

Cast:
Satish Rajwade as Bhai Raja
Bhushan Pradhan as Rahul
Nidhi Oza as Priya
Bhau Kadam as Auto wala
Sanjay Mone as Priya’s Father
Hrishikesh Joshi as Sr. Inspector Vittu Popat
Vishwajeet Pradhan as Big Bhai