१२३४ (वन टू थ्री फोर ) सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला … 27th May, 2016

1052888_1545140115723760_7571717418960722866_o
आपल्या आवडत्या कलावंताला त्याच्या नेहमीच्या भूमिकेत पाहणे म्हणजे रसिकाचे मनोरंनजन. पण त्याच कलाकाराला त्याच्या धाटणीच्या नव्हे तर वेगळ्या भूमुकेत पाहणे म्हणजे त्याच रसिकाला मनोरंजनाची एक भेट मिळावी असे ठरेल. १२३४ हा सिनेमा देखील असाच काही अनपेक्षित गुपितांनी सज्ज झाला आहे.

तरुण दिग्दर्शक मिलिंद कवडे याचे हे रंजक धाडस रसिकांची दाद मिळावी यासाठी तयार झाली आहे. चित्रपट, त्याचे कथानक, त्याची पटकथा सर्व कलाकारांचा अभिनय अशी एकूण कसदार कलाकृतीकरिता आवश्यक सर्व छटा या चित्रपटात जमून आल्या आहेत. चित्रपट समाजातील विविध प्रश्नावर भाष्य करतो. सध्या भ्रष्टाचार हा समाजातील प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो पण त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम कुठे न कुठे होत असतो. हाच विचार मांडण्याचा दिग्दर्शकाचा मानस आहे.

चित्रपट अनेक दिग्गज कलाकारांच्या वेगळ्या भूमिकांनी सजलेला आहे. त्यात अरुण कदम, अभिजित चव्हाण, अंशुमन विचारे, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन,विशाखा सुभेदार, संजय मोने, यतीन कार्येकर, कमलेश सावंत, आणि संजय नार्वेकर या कलाकारांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे हे कलाकार इतर वेळेस विनोदी भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसत असले तरी या चित्रपटात मात्र प्रेक्षकांना हे सर्व कलाकार वेगळ्या भूमिकेत वावरताना दिसणार आहेत. प्रिया मराठे व भूषण प्रधान चित्रपट नायक व नायिकेची भूमिका करत आहेत.

चित्रपटाची कथा व पटकथा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचीच आहे. संवाद सागर वानखेडे यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे निर्माते कल्पेश पटेल व शैलेश पवार आहेत. संगीतकार अमित राज यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे व सचिन अंधारे यांनी गीत लिहिले आहे. चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाजू ही व्यावसायिक व कुशल कलाकारांनी लीलया पेलल्या आहेत.

१२३४ हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होत आहे. भ्रष्टाचार या विषयावर भाष्य करणारे याआधी ही काही चित्रपट आले आहेत परंतु, समाजातील या विदारक वास्तवाची पाळमुळ इतकी खोलवर रुतलेली आहेत कि पुन्हा नव्याने त्यावर एखादी कलाकृती जन्म घेऊ शकते. हा चित्रपट हे वास्तव अधोरेखीत करेल व समाजाला बदल आवश्यक आहे याचा पुन्हा एक विचार देऊन जाईल.

1234 Marathi movie

• Movie : 1234 (2016) | व्रुन्दावन
• Producer : Kalpesh Patel, Shailesh Pawar
• Directer : Milind Kavde
• Studio : K.P. Cinevision, Sheetal Film Production
• Star Cast : Bhushan Pradhan, Priya Marathe, Vijay Kadam, Anshuman Vichare, Jaywant Wadkar, Pradeep Patwardhan, Vishakha Subhedar, Sanjay Mone, Yatin Karyekar, Kamlesh Sawant, Abhijeet Chavan & Sanjay Narevekar.
• Story & Screenplay : Milind Kavde
• Music : AmitRaj
• Lyrics : Sachin Andhare
• Dialogues : Sagar Wankhede
• Director of Photography : Santonio Terzio
• Action : Anandraj & Ramanna
• Background Score : Salil Amrute
• Editor : Pranav patel
• Sound Design :
• Choreographer : Bhanu
• Art Director : Sandip Kunchikorwe
• Costumes : Vaishali Deshmukh
• Casting Director : Vaibhav Wagh
• Genre : Drama
• Release Date : 27th May 2016