अंश – एक हृदयस्पर्शी चित्रप…… चित्रीकरण पुर्ण

IMG-20160328-WA0006

‘अंश’ यापूर्वी समाजासमोर कधीही न चर्चिला गेलेला आशय असलेला हा चित्रपट . चित्रपटातील सर्वपात्र व भूमिका साकारण्यासाठी सर्व कलाकारांची निवड फारच विचारपूर्वक केली गेली आहे. चित्रपटाचेदिग्दर्शक संदीप त्रिलोकेकर यांनी दिग्दर्शनासोबतच छाया  निर्देशकाची भूमिका लीलया साकारलीआहे. चित्रपट सॅप अम्युझमेंट प्रोडक्शन व सॅम फिल्म्स स्टेशन प्रोसेसर यांची निर्मिती आहे.

श्री. पी. के. पंडित व समीर शेख हे निर्माते अहेत. राहुल जीवन हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.

कुणाल गांजावाला, तरन्नुम मलिक, नेहा राजपाल आणि मिथीला माळी  यांनी चित्रपटातील रंजकगाणी गायली आहेत. प्रफुल्ल कार्लेकर हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत.

चित्रपटाचा विषय हा रसिकांसाठी एक वैचारिक पर्वणीच असेल आणि समाजातील नेहमीच दुर्लक्षितराहिलेल्या  एका घटकाकडे लक्ष वेधून घेईल . चित्रपटाची संकल्पना व लेखन समीर शेख व इम्तियाझकुरेशी यांनी केले आहे. राजेश शृंगारपुरे, मनीषा केळकर, गिरीश परदेशी, राजेंद्र शिषाटकर  आणि उमेशठाकूर या कलाकारांनी आपापल्या भूमिका अत्यंत कसदारपणे निभावल्या आहेत.

नुकताच पार पडलेल्या नाशिक चित्रपट महोत्सवात चित्रपटाची झलक दखवण्यात आली होती आणित्यास प्रेक्षकांकडून व आयोजकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता.